प्रमुख क्षेत्र 1


प्रमुख क्षेत्र १: शाळेचे सामर्थ्य स्रोत : उपलब्धता, पर्याप्तता आणि उपयोगिता 
   
    या क्षेत्रात एकूण १२ गाभा मानके असून त्यातील प्रत्येक मानकास स्तरानुरुप गुणदान करण्यात
 आले आहे. या क्षेत्रातील गाभा मानके खालीलप्रमाणे आहेत.

१)       शालेय परिसर
२)      क्रीडांगण, क्रीडा साधने /साहित्यासह
३)      वर्ग खोल्या आणि इतर खोल्या
४)      विद्युत आणि विद्युत उपकरणे
५)     ग्रंथालय
६)      प्रयोगशाळा
७)     संगणक (जेथे उपलब्ध आहे तेथे)
८)      उतार रस्ता (रान्प)
९)      मध्यान्ह भोजन, स्वयंपाकगृह आणि भांडी (जेथे स्वयंपाक शालेय परिसरात केला जातो)
१०)   पेय जल
११)    हात धुण्याची सुविधा
१२)   स्वच्छता–गृहे 

प्रमुख क्षेत्र १: शाळेचे सामर्थ्य स्रोत : उपलब्धता, पर्याप्तता आणि उपयोगिता

वर्णन विधाने
उपलब्धता आणि पर्याप्तता (३६ गुण)
गुणवत्ता आणि उपयुक्तता (७२ गुण)
अ.नं
गाभा मानके
स्तर-१
स्तर-२
स्तर-३
स्तर-१
स्तर-२
स्तर-३
१)
शालेय परिसर
  
१०
१५
२)
क्रीडांगण, क्रीडा साधने /साहित्यासह
  
१०
१५
३)
वर्ग खोल्या आणि इतर खोल्या
  
१०
१५
४)
विद्युत आणि विद्युत उपकरणे
  
१०
१५
५)
ग्रंथालय
  
१०
१५
६)
वर्ग व्यवस्थापन
  
१०
१५
७)
प्रयोगशाळा
  
१०
१५
८)
संगणक (जेथे उपलब्ध आहे तेथे)
  
१०
१५
९)
मध्यान्ह भोजन, स्वयंपाकगृह आणि भांडी
  
१०
१५
१०)
पेय जल
  
१०
१५
११)
हात धुण्याची सुविधा
  
१०
१५
१२)
स्वच्छता–गृहे
  
१०
१५

कमाल गुण (१०८)
१२   
२४  
(३६)
२४   
४८   
(७२)

वरील प्रत्येक गाभा मानकास शासनाने पुरविलेल्या पुस्तकेतील या क्षेत्रातील दोन विभागांपैकी “उपलब्धता आणि पर्याप्तता’ या अंतर्गत वर्णन विधानांतील बाबींनुसार स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १ गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी २ गुण आणि स्तर-३ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ३ गुण आहेत. असे यासाठी ३६ गुण आहेत.
तसेच ‘ गुणवत्ता आणि उपयुक्तता या दुसऱ्या विभागात या अंतर्गत वर्णन विधानांतील बाबींनुसार स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी २ गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ४ गुण आणि स्तर-३ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ६ गुण आहेत. असे यासाठी ७२ गुण आहेत. दोन्ही विभागांचे मिळून या क्षेत्रासाठी एकूण गुण १०८ आहेत.
‘शाळा सिध्दी’ पुस्तिकेतील प्रत्येक स्तरानुरूप आवश्यक बाबी जाणून घेऊन त्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यांची, नोंदींची पूर्तता शाळांना स्तर उंचाविण्यासाठी करावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा